उमदी प्रवास (map)




कसे याल ?


                 या संप्रदायात देवाकडे जाण्याचा एकच मार्ग सांगितला आहे तो म्हणजे नामस्मरणाचा तसेच उमदी क्षेत्री श्री

महाराजांच्या दर्शनाच्या रस्त्याने येण्याचा एकच मार्ग आहे. येथे विमानाने, रेल्वेने येता येत नाही. पण मुंबई, पुणे,

सोलापूर, कोल्हापूर, सांगली, हुबळी, विजापूर येथून उमदीस येता येते.


              मुंबई, पुण्याहून आपणास रेल्वेने सोलापूरला येता येते. तेथून जत, सांगली, कोल्हापूरच्या व्हाया उमदी

जाणार्‍या बसेस मिळतील. बसने आल्यास आपण २.५ ते ३.५ तासात उमदीस पोहचता. स्वतःच्या गाडीने व्हाया

झळकी किंवा व्हाया मंगळवेढा असे दोन मार्ग आहेत. दोन तासात आपण उमदीस पोहचाल.कोल्हापूर, सांगलीहून

सोलापूरच्या बसने आपण उमदीस ३ ते ४ तासात पोहचाल. जतपर्यंत सारख्या गाडया आहेत. जतहून उमदीस १

तासात पोहचता येते.
   
              पुण्याहून सकाळी ८ वाजता विजापूर बस आहे ती उमदीस ४ वाजता पोहचते.तसेच मुंबई, पुण्याहून

रात्रीच्या गुलबर्गा, रायचूरकडे जाणार्‍या व्हाया मंगळवेढा, चडचण बसेस आहेत. मंगळवेढयाहून व चडचणहून

सारख्या बसेस उमदीपर्यंत आहेत.विजापूरहून पंढरपूर, चडचण कडे जाणार्‍या बसेस तसेच खाजगी वाहने आहेत.

विजापूरहून आपण १ ते २ तासात उमदीस पोहचता.निंबाळहून आपणास इंडी किंवा होर्तीस बसने, रेल्वेने येता येते.

तेथून चडचणला बसेस आहेत. तेथून खाजगी वाहने उमदीस येण्यास मिळतात.


           उमदी बस स्टँडहून श्री महाराजांचा मठ अगदी जवळ आहे. तेथून तुम्हाला कोणीही मठाचा रस्ता सांगेल /

दाखवेल. चालत येता येते.
 

 

सोलापूर- उमदी (अंतर ८० कि.मी.)

विजापूर-उमदी (अंतर ५३ कि.मी.)

जत-उमदी (अंतर ५३ कि.मी.)

कोल्हापूर-सांगली-जत-उमदी (अंतर २०० कि.मी.)

सांगली-उमदी (अंतर १४० कि.मी.)

मंगळवेढा-उमदी (अंतर ३५ कि.मी.)

चडचण-उमदी (अंतर ११ कि.मी.)

पंढरपूर-उमदी (अंतर ५५ कि.मी.)

उमदी-निंबर्गी (अंतर १० कि.मी.)

उमदी-निंबाळ (अंतर ४२ कि.मी.)


                                                
                                          
 
© copyright: Shree Bhausaheb Maharaj Trust Umdi
Powered By builtCMS