Shri Bhausaheb Maharaj Umdikar
नामस्मरणाने सर्व कार्यसिध्दी होते.

निवास व्यवस्था


राहण्याची व्यवस्था:
               

             
         महाराजांच्या जुन्या वाडयात ६ खोल्या भाडयाने घेण्यात आल्या आहेत. त्यात येणार्‍या साधकांची राहण्याची

व्यवस्था होते.

दोन मोठे हॉल (पुरूष साधकांच्यासाठी एक व स्त्री साधकांच्यासाठी एक उपलब्ध आहेत.)

सर्व साधकांना पहाटे चहा, सकाळी नाश्ता, दुपारी प्रसाद, संध्याकाळी चहा व रात्री प्रसाद नित्य मिळतो.

येथे येणार्‍या भाविकांना मठात चालणार्‍या सर्व कार्यक्रमात सहभागी होणे आवश्यक आहे.


येणाऱ्या भाविकांना ,साधकांना ,राहण्याच्या,झोपण्याच्या शक्य तितक्या सोयी  देण्याचा प्रयत्न केला आहे .त्या बरोबर

त्यांचा येण्याचा उद्देश लक्षात घेऊन ध्यानमंदिरात उत्तम व्यवस्था ठेवली जाते .भजन ,प्रवचन
व पोथी वाचन हे

कार्यक्रम नियमितपणे वेळच्यावेळी करण्यात येतात .याच जागेत श्री महाराजांनी अहोरात्र नेम केला असल्याने

साधकांना त्यांच्या नामसाधनेत याची प्रचिती येते .साधनात वाढ होते ,साधकाचा आत्मोद्धार होतो .सर्व साधकांनी येथे

येऊन याचे प्रत्यंतर घ्यावे. 
© copyright: Shree Bhausaheb Maharaj Trust Umdi
Powered By builtCMS