Shri Bhausaheb Maharaj Umdikar
नामस्मरणाने सर्व कार्यसिध्दी होते.

उमदी -पावन भूमी
उमदी स्थान माहात्म्य:

                                                       
                                        उमदी येथे नारायणाचे एक फार पुरातन मंदिर आहे. व ते तेथील ग्रामदैवत असल्याने उमदीचे नाव

नारायणपूर असे होते. कालाच्या ओघात मंदिराचे अस्तित्त्व नष्ट झाले असले तरी नारायणाच्या मूर्तीचे तेथे अजुनी

दर्शन होते. उमदी ही भाऊसाहेबमहाराजांची जन्मभूमी, कर्मभूमी व तपोभूमी असल्याने ते पवित्र क्षेत्र बनले आहे.
  
श्री गुरूदेव रानडे यांनी खालील पत्रात प.पू. महाराजांच्या बद्दलच्या आपल्या भावना पत्राने व्यक्त केल्या आहेत.


" आपणास भाऊसाहेब महाराज या नावाने हाक मारण्यापेक्षा आत्मज्ञान म्हणून हाक मारणे जास्त चांगले होणार

आहे. आपले देवाशी तादात्म्य झाले असल्याने देह-उपाधि, नाम-उपाधि व रूप-उपाधि सर्व लयास गेली आहेत.

आपण केवळ देवरूप झाला असल्याने आपणास आत्मदेव म्हणून हाक मारण्यास काय हरकत आहे?"            श्री निंबर्गीमहाराज व श्रीभाऊसाहेब महाराज यांच्या विषयी श्री गुरूदेवांना किती नितांत प्रेम होते, श्रध्दा होती

हे शब्दांत सांगता येणार नाही.  श्री गुरूदेवांनी गुरूभक्तीचे व्रत अखंड, एक निष्ठेने, अखेरपर्यंत आचरिले व उत्तरोत्तर

तिच्यामध्ये वाढ होत जाऊन अखेरीस गुरू साक्षात परब्रह्म या अनुभवास ते पोहोचले. एकदा श्री गुरूदेव नेमाच्या

खोलीतून बाहेर आले व म्हणाले, महाराज एक पक्व पक्व फळ झाले होते. त्याचे वर्णन कसे करणार ? त्यांचे

आम्हावरील उपकार अमोल आहेत. चोवीस तास ते व देव एकच असत. ते इंचगेरीस अगर उमदीस जात तेंव्हा तर ते 

उन्मनस्क अवस्थेत असत कारण ती श्रीगुरूदेवांची प्रत्यक्ष गुरूगृहेच होती. तेथे श्री गुरूदेवांना आपल्या सद्‌गुरूंच्या

पाऊलांच्या खुणा उमटलेल्या पदोपदी दिसत. तेथे गेल्यावर ते आत्मानुभवांत मग्न असत.त्यावेळी ते म्हणाले," महाराजांनी हा सर्व प्रदेश नेम करून पावन केला आहे. श्री गुरूदेवांना उमदी येथील दगडधोंडेंही अत्यंत

    प्रिय व पूज्य वाटत."समर्थांनीही पंचवटी संबंधी आपल्या भावना तशाच पुढील ओवीच्या आधारे प्रगट केल्या आहेत.
                                                                       
                                                      
                                                                      जनस्थान गोदातटी ! परमपावन पंचवटी !
                                                                       
                                                                        जेथे पडली कृपादृष्टी ! रघुत्तमरायाची !
        

असेच उमदीचे व निंबरगीचे महत्त्व श्री गुरूदेवांच्या ठायी होते. श्री गुरूदेवांना प्रभु रामचंद्ग, समर्थ रामदास व

श्रीभाऊसाहेबमहाराज हे तिघेही एकाच तिथीस-रामनवमीस-जन्मले या गोष्टीचे विशेष महत्त्व वाटे.
       

         प.पू. शिवलिंगव्वाअक्का उमदीस गेल्या असता आलेला स्वर्गसुखाचा अनुभव त्यांनी खालील पत्रातून व्यक्त

केला आहे.
         

                                        श्री समर्थ महाराज स्मरण केलेली स्वर्गभूवन पावयास गेलो. स्वर्गभूवन पाहून मला

असेआराम व आनंद झाले की ते मला सांगता येत नाही. ते जागेत समर्थांचे स्मरण करीत अर्धा तास बसले

होते. चहुकडे  गद्दरणी, गडगडा आवाज होत असता पावसाचे थेंब एक एक पडले होते. त्यात सूर्याचे उजेड-

प्रभाकर ते जागी पडलेहो ते की ते सांगता येत नाही.डोळे कुक्क दिपू लागले. समर्थाचे स्वर्गभूवन हालू

लागले. इतके ऐश्वर्य की आनंदात डोलू लागले. समर्थांचे २५ वर्षे अरण्यवास सहन करून स्वर्गभूवन पाहून,

देवलोकास जाऊन, भेट होऊन नरलोक रक्षाया करणे परत येत होते.


  
© copyright: Shree Bhausaheb Maharaj Trust Umdi
Powered By builtCMS