Shri Bhausaheb Maharaj Umdikar
नामस्मरणाने सर्व कार्यसिध्दी होते.

आचारसंहिता






श्री भाऊसाहेब महाराज पीस फौंडेशन मठ, उमदी :
 


प्रार्थना

 

                                  ~ मठात येणाऱ्या साधकांनी येथील रजिस्टर मध्ये आपले नाव,पत्ता,मोबाईल नंबर,

प्रयोजन व काळ लिहिणे बंधनकारक आहे. 

                     
                                 ~मठात येणाऱ्या भाविकांनी येथे नित्य होणाऱ्या नेम, भजन, पोथी व सप्ताहामध्ये प्रवचन या

कार्यक्रमांना उपस्थित राहणे व सहभाग घेणे आवश्यक आहे .मठाची शिस्त सर्वानाच पाळावी लागेल 

                                 
                               ~ ही श्री भाऊसाहेब महाराजांची वास्तू आहे .जिथे महाराजांनी ९ तास नेम (ध्यान) ,५तास

पोथी, भजन व प्रवचन केले आहे .या वास्तूमध्ये त्यांनी आचारिलेल्या प्रमाणेच नेम,भजन,पोथी हा कार्यक्रम येथे

येणाऱ्या सर्व भाविकांनी मनापासून आचरीला पाहिजे .येथे येऊन नेम करून त्यांचा कृपाशिर्वाद घेऊन आपला

आत्मोद्धार करून घेतला पाहिजे .इथे येण्याचे हेच एक प्रयोजन असले पाहिजे 

                           
                                ~ दिवसाच्या काही विशिष्ट वेळेतच मेघडंबरीच्या आत प्रवेश करून दर्शन घेता

येईल.अन्यवेळी कृपया मेघडंबरीच्या बाहेरूनच श्री महाराजांचे दर्शन घेऊन कृपा -प्रसाद घ्यावा ही विनंती. 


                               ~ मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांनी ट्रस्टीना पूर्व सूचना देऊन व ट्रस्टची परवानगी घेणे

आवश्यक आहे .ऐनवेळी मोठ्या संख्येने येणाऱ्यांची सोय करणे अवघड होते व ते दोघांनाही गैरसोयीचे होते .याची

कृपया नोंद घ्यावी व सहकार्य करावे . 

             
                               ~ ध्यानमंदिरात व मठात श्री सद्गुरू भाऊसाहेब महाराज यांच्या फोटो व्यतिरीक्त अन्य

कोणाचेही फोटो,पादुका,इतर साहित्य  आणण्यास व पुजण्यास बंदी आहे .मठात श्री महाराजांच्याशिवाय अन्य

कोणाचेही  समारंभ आयोजित करण्यास सक्त मनाई आहे . श्री महाराजांच्या पवित्र स्थानात त्यांनी दाखविलेल्या  

मार्गानेच अवलंबन होणे आवश्यक आहे . 


                              ~ मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांनी  कृपया वर्षभरात मठात होणाऱ्या सप्ताहामध्ये येऊ नये.

अन्यवेळेस पूर्व सूचनेने येण्यास मुळीच हरकत नाही .अवश्य यावे .सप्ताहामध्ये तेथे नित्याच्या कार्यक्रमास व हे

आलेल्या साधकांच्या नेमत,नामसाधनेत व्यत्यय येवू शकतो .गैरसोय होते याची कृपया नोंद घ्यावी व सहकार्य करावे

ही
 विनंती. 


                            ~ श्री महाराजांच्या प्रेरणेने व कृपेने मठात मठात अनुग्रह घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी कृपया

ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा .आपणास श्री महाराजांनी घालून दिलेली पद्धत ,नामाचे महत्व व श्रेष्ठत्व,

अनुग्रहाच्यावेळी घ्यावयास लागणारी शपथ,नामस्मरणाची प्रक्रिया समजावून सांगण्यात येईल व त्याबरोबरच नेमास

उपयुक्त असावे साहित्य देण्यात येईल . 


                         ~ आपण सर्वांच्या सहकार्यानेच वर्षभराचे सर्व कार्यक्रम भक्ती आणि भावपूर्वक साजरे होतील.

नेमाच्या साहाय्याने महाराजांच्या कृपेचा लाभ होईल. 

 


---सेक्रेटरी 
© copyright: Shree Bhausaheb Maharaj Trust Umdi
Powered By builtCMS