Shri Bhausaheb Maharaj Umdikar
नामस्मरणाने सर्व कार्यसिध्दी होते.

विचार रत्ने


     
        
              
                  महाराजांच्या पत्राचे मध्यवर्ती सुत्र म्हणजे "नेम", ध्यान, साधन त्याभोवती इतर साधनांची भजन पोथी, प्रवचनांची गुंफण, नेम निष्ठेबद्दल आग्रह आहे. पत्रातून मुख्यत्वे आत्मबोध आहे. हा आपल्या सांप्रदायाचा अमोल ठेवा आहे. 


*************************************************************************************************


श्री महाराजांचा परमार्थ सोपान : 

 

     ***गुरूला तन,मन,धन द्यावे.     ***मी साधक, गुरूपुत्र आहे, हे स्मरण सतत असावे​


     ***प्रपंचात परमार्थ विसरतो. त्यावर उपाय, रोजनेमाने नामस्मरण


      ***देवास येथेच पहावे.

     
       ***देव करील तेच होईल या दृढ श्रध्देने प्रपंच करावा.


       ***मनाला साक्ष ठेवुन नेम (ध्यान) करावा.

   
       ***देहाला बारा तास द्या, देवाला बारा तास द्या.


       ***नाम नेमाने, निष्ठेने, निश्चयाने व कष्टाने केले म्हणजे सख्यभक्ती होते. 

 
       ***सद्‌गुरू नामस्मरण करणार्‍या शिष्याच्या सदा सानिध्यात असतात.


       ***नामस्मरणाने सर्व कार्यसिध्दी होते.


       ***हरिकृपेने प्रारब्धाचा नाश होतो.

 
       ***स्वरूपी राहणे हा स्वधर्म, त्याला यश म्हणजे देवपण.


       ***प्रपंच व परमार्थाचा समन्वय करावा.


       ***जीवनाचे ध्येय-जीवास लीन करणे.


       ***देह आहे तो पर्यंत प्रत्येक श्वासात नाम घेणारा ईश्वर-रूप होतो. एकही श्वास नामाशिवाय जाऊ नये याची काळजी घ्यावी
 

       ***नाम वाढविणे म्हणजे रोज दीर्घकाळ नामस्मरण करणे, चढविणे म्हणजे भावयुक्त, एकाग्रतेने व उत्साहाने                                
               नामस्मरण करणे       ***नामच तारील, नामाचेच सामर्थ्य आहे.


 
      ***देव करील ते मानावे.       ***सद्‌गुरू देहाने दूर असले तरी, संकट दूर करण्यास शिष्याच्या जवळच असतात असा अनुभव घ्यावा.
       ***साधकाने सदा देव देव म्हणावे, मग सदा देव त्याच्या जवळच आहे हा अनुभव येतो.          ***
धरणी दुभंगली, आकाश कोसळले तरी नाम सोडू नका. (अखेरचा संदेश)

 
 


© copyright: Shree Bhausaheb Maharaj Trust Umdi
Powered By builtCMS