अमूर्त पादुकांद्वारे अनुग्रहास प्रारंभ:
श्री महाराजांच्या कृपेची आणखीन एक प्रचिती आली. अश्विन वद्य पंचमीस नाम देण्यास प्रारंभ
झाला. उमदी येथे घडलेल्या दोन तीन प्रसंगातून आर्त भाविकांना नाम देण्याचे संकेत श्री महाराजांनी दिले. त्यांच्याच
आशिर्वादाने व प्रेरणेने प्रथम ११ भाविकांना श्री महाराजांच्या कडून नाम मिळाले. बरीच वर्षे गुप्त असलेली ही नाम
गंगा श्री महाराजांच्याच कृपेने पुन्हा प्रकट झाली. श्री महाराजांचे आपणावर किती मोठे उपकार आहेत. श्री
महाराजांची करणी अगाध आहे. अनाकलनीय आहे. स्थानिक भाविकांना व जवळ पासच्या खेडयात राहणार्यांना
याचा जास्त लाभ घेता येईल व होईल.
महाराजांचे शिष्य :
महाराजांचे अनेक शिष्य होते. पण प्रामुख्याने व परमार्थाचे टोक गाठलेले (शिखर) काही शिष्य
श्री अंबुराव महाराज श्री. शिवलिंगव्वा अक्का
श्री. गुरूदेव (डॉ. आर.डी. रानडे) श्री. गिरमल्लप्पा
श्री. सावळसंग काका श्री नंद्याप्पा न्यामगौडा
श्री सिध्दरामेश्वर महाराज श्री रामराव तिकोटेकर
श्री पुंडप्पा श्री अल्लप्पा धडुती
श्री कबीर साहेब श्री निंगप्पा सावळगी
श्री गणपतराव पवार श्री गणेशशास्त्री चौथाई
श्री तुकाराम सुतार श्री शिवप्पा मुरगोड
श्री बाळप्पा पिटेल श्री हणमंतराव कन्नुर
श्री राजाराम शिंपी श्री एन.जी. दामले
******************************************************************************************